७,८. जाडे बोंबिल
४चमचे. आलं, लसूण, कोथिंबीर, मिरचीचं वाटण
१ चमचा. हळद
१/२ चमचा. आमचूर पावडर
१चमचा. धणे पावडर
२ छोटे चमचे. लाल तिखट
१चमचा. मीठ
२ चमचे. बारीक रवा
२ चमचे. तांदूळ पीठ
२चमचे. बेसन
४,५चमचे. तेल
कृती:
प्रथम बोंबिल साफ करून,धुवून घ्या. बोंबिलांना मधून सुरीने चिरा पाडून ते मोकळे ,पसरट करा.आणि ताटलीत पसरुन ठेवून वर दुसरी ताटली ठेवा आणि वर जड कुकर कीवा जड वस्तू ठेवा.महणजे बोंबिलातलं पाणी बाहेर पडेल. तोपर्यंत एका ताटलीत रवा, बेसन, तांदूळ पीठ, मीठ,हळद, लाल तिखट एकत्र करून मिश्रण करा.१५ मिनिटांनी बोंबलांवरची वस्तू काढून पसरट बोंबिल प्लेटमध्ये काढा.नंतर ते तयार केलेल्या पीठाच्या मिश्रणात छान घोळवून दोन्ही बाजूला मिश्रण दाबून लावा. गॅसवर मध्यम आचेवर तवा गरम करून त्यात २ चमचे तेल घालून सगळीकडे पसरवून घ्या. नंतर त्यात वेळेला २ गटगिळे ठेवून दोन्ही बाजू चुरचुरीत भाजून घ्या .सगळे गटगिळे भाजल्यावर गरमागरम गटगिळे सर्व्ह करा.
——————————-
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल OnePlus Nord CE 3 5G: https://amzn.to/3WwESUc
माइक Boya BY-V10 2.4 ghz: https://amzn.to/3SHjHxY
लॅपटॉप Lenovo IdeaPad Slim 3: https://amzn.to/4fGcJ6e
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport: https://amzn.to/4ddHGwU
source